Home

Saturday, July 13, 2019

गिफ्ट




              रात्रीचे साडे दहा वाजत होते. वाढत्या रात्री बरोबर अरुणच्या फेऱ्या वाढतच चालल्या होत्या. हातातील फोन सारखा चेक करून पाहत होता तो. नेटवर्क चा प्रॉब्लेम तर नाही ना. आज कसा हा लेट झाला. नेहमी पाच ला घरी येतो आज अकरा वाजता आले तरी नाही. त्यात मी कॉल करतोय तर लागेना आणि त्याचा स्वतःहून समोरून काही मेसेज पण नाही. ट्रॅफिक मध्ये अडकला की अचानक काही काम आलं? बाकीच्या दिवशी उशिर झाला असता तर काही नसतं वाटलं पण आजच का? अरुण ने त्याचे विचार थांबवले.


                 त्याने नवीन घातलेले कपडे काढले आणि घरचे कपडे घातले. तो आता घर आवरायला घेणार होता पण काही वेळ थांबू म्हणून तो जरा रागाने आणि काळजीने  धपकन सोफ्यावर तोंड पडून बसला. तो बसताच सोफ्यावर पसरलेल्या गुलाबाच्या लाल गुलाबी पिवळ्या पाकळ्या उडून पडल्या. बारा वाजत आले अरुण ला हळू हळू पेंग येऊ लागली. तो डुलक्या देऊ लागला. त्याचा डोळा लागणार तेवढ्यात दरवाजाच लॉक उघडल्याचा आवाज आला तसा तो झटकन उठला. बाहेरून दरवाजा उघडला गेला होता.

Thursday, July 4, 2019

जिम मध्ये गाळला...... घाम

 अगोदरच्या कथांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्यातून फेसबूकवर खूप मित्र भेटले. खूप गप्पा झाला तर काहींनी स्वतःच्या गोष्टी ऐकवल्या त्यापैकी एका मित्राने त्याच्या अनुभवावरून कथा लिहण्याची विनंती केली. ती कथा मी माझ्या प्राणयरसात रंगवून मांडत आहे.


      नेहमी प्रमाणे रविवारचा दिवस होता. मस्तपैकी बेड वर लोळत दिवसाची सुरुवात झाली होती. बायको स्वयंपाक करून शेजारी मैत्रिणीकडे गेली होती. मटण खायचं,झोपेत दिवस घालवायचा असा प्लॅन होता. पण अचानक मित्राचा फोन आला,
"हॅलो मन्या काय करतोयस रे?"
"काही नाही मस्त रविवार म्हणून दिवस भर नुसता आराम."
"मज्जा आहे तुझी. तुला जरा त्रास द्यायचा होता अरे  माझं एक काम करशील का?"
"झालं बघवत नाही का रे तुला माझं सुख साल्या. कालच गावावरून आलोय तर आज दिवसभर झोपेन तर तू टपकलास." मी शिवी हासडत त्याला बोललो.