Saturday, December 29, 2018

मी आणि राजन

              

"तर मग उद्याच पक्क ना?"

"हो नक्की"

"केव्हा एकदा तुला भेटतोय असं झालाय"

"मला सुद्धा"

"ओके! शुभरात्री"

"शुभरात्री"

राजन ला शेवटचा मेसेज करून उद्या तो भेटल्यावर काय काय करायचं या विचारात मी हरवून गेलो.  गेले दोन आठवडे आम्ही चॅट करतोय पण एकमेकांना भेटण्यासाठी कधी वेळ नाही मिळाला,पण उद्या आम्ही भेटणार. आई बाबा काही दिवसांसाठी गावी चालले होते म्हणून मी राजन ला मेसेज करून कळवलं कि उद्या मी घरी एकटा आहे तर भेटूयात का? आणि त्याचा हि लगेच होकार आला.
राजन मला Grindr(हे एक गे डेटिंग अँप आहे) वर भेटला. मी माझाच फोटो प्रोफाइल वर ठेवल्यामुळे पहिला मेसेज त्याचाच आला. हाई,हॅलो,दोघांच्या आवडी निवडी ते फोटो शेअर करून सगळं झाल आता फक्त भेटायचं बाकी होत.