Saturday, June 1, 2019

पावसाळ्यातील वसंत

             
  आज खूप दिवसांनी खारघरच्या मॉल मध्ये जाणं झालं. सरकत्या जिन्यावर ही मी पटापट पायऱ्या चढत वर चाललो होतो. खूप दिवसांनी नवीन काही तरी वाचायचं ठरवलं होतं. मी 'बुकफेअर' च्या दुकानात पोहोचलो आणि काऊंटर वर काही बोलणार तेवढ्यात तिथल्या बाईंनी मी मागावायला सांगितलेले पुस्तक माझ्या समोर ठेवले.
"अरे व्हा! या वेळी लवकर आलं." मी स्माइल देत म्हणालो.
"हो तू सांगितलंस आणि मी लगेच ऑर्डर टाकली" बाई म्हणाल्या.
"खूप खुप थँक्स!" मी पुस्तकाकडे पाहत म्हणालो "सेपिअन्स" नाव होत त्याचं.

          एवढ्यात मला जाणवलं एक होमो सेपिअन मला एकटक पाहतोय.मी मग त्या दुकानातून निघालो ते कपड्यांच्या दुकानात गेलो. 'ब्रँड फॅक्टरी' च्या दुकानात आल्यावर वळून पाहिलं तर तो अजून हि माझ्या पाठी येतोय! दिसायला देखणा असला तरी मला सध्या मला माझ्या घरी जाऊन पुस्तक वाचायचं होत. म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही.