Saturday, March 28, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-५






                       बाहेर विजांचा जोरदार कडकडाट झाला. बाहेरील काळ्या ढगांतून जोरदार वीज कडकली. विजेच्या कडकडण्यामुळे संपूर्ण घर प्रकाशात उजळून निघालं. विजेचा लोळ अंगणात नाही तर पवनच्या अंगावर पडावा तसा पवन झोपेतून उठला. अगदी घामाघूम झालेला. त्याने आपले हात डोळ्यासमोर केले. दोन्ही पंजे, नखं पाहू लागला, सगळं काही व्यवस्थित होत. फक्त बाहेरचं वातावरण बदलल होत. त्याने स्वप्नात पाहिलं तस काळ, ढगाळ आणि विजेच्या गटागटाने भरलेले.


Wednesday, March 25, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-४




                  सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश दिसत होता. सुबोध आणि पवन दिवाणखाण्यात होते. सुबोध व्हीलचेअर वर बसून होता तर पवन त्याच्यासमोर हात पसरून उभा होता.

"ये माझ्या हाताला पकड आणि उभा राहण्याचा प्रयत्न कर." पवन म्हणाला.

"नको मी पडेल." सुबोध ने नकारघंटा वाजवली.

"असं कसं पडशील मी आहे ना मी सावरेल तुला."

"नको मी असाच ठीक आहे."

"हे बघ अस नाही चालणार. तुला व्यायाम करावाच लागेल."

"काल तर केलेला." सुबोध तोंड वाकडं करत म्हणाला.

"हो! काल केलेला,आज पण करायचा,आणि उद्या पण करणार. उठ उभा राहण्याचा प्रयत्न कर." पवन जरा दटावून म्हणाला. "दे माझ्या हातात हात आणि रहा उभा."

Sunday, March 22, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग३



                   पवन आणि सुबोध ला येऊन बरेच दिवस झाले होते नवीन घरात. पवन घरूनच काम करत होता. त्याचबरोबर तो सुबोध चा व्यायाम सुद्धा घेत होता. जेणे करून तो लवकर ठीक व्हावा. टिन्या सकाळी येत घराची सफाई आणि दुपारचं जेवण बनवून जात. परत तो संध्याकाळी येत आणि रात्रीच जेवण बनवून जात असे. सूर्य मावळायच्या आत. अशीच एक शांत शांत दुपार होती. पवन ने आज दुपारी टिण्याला थांबून घेतलं होतं. तो घर साफ करून घेत होता त्याच्या कडून.
जिना उतरत टिन्या खाली आला.

Thursday, March 19, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग२


      
                    रस्त्यावरची धूळ उडवत पवनची गाडी गावामधून चालली होती. सगळी लोकं त्या गाडीकडे पाहत होते आणि कुजबुजत होते.

"ह्यांनीच घेतलाय वाटत त्यो बंगला"  कोणीतरी विचारलं.

"व्हय ह्योच नवीन मालक हाय वाटत" कुणाचा तरी आवाज आला.

"तुम्हाला काय र माहीत कोण राहतेय आन कोण नाय?" एकाने शंका विचारली.

"रघुनी सांगितलंय एक नवीन सायेब येणार हाय. दोन आठवड झालं चार-पाच माणसं घिऊन गेलाय तिकडं बंगला झाडायला" एक म्हातारा खोकत म्हणाला.

Sunday, March 15, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग१

  धुकं..धुकं.... धुकं...... आणि फक्त धुकं दिसत होत खिडकी बाहेर. मी खिडकी खोलून बाहेर गेलो. पण ते धुकं जवळपास नव्हतं. मी जसा जवळ जात  तस ते लांब पळत होत. खूपच विचित्र स्वप्न होत ते. थंडीने उठलो मी स्वप्नातून. तशी थंडी आहे खूप पण खिडकी-दरवाजा बंद आहे म्हणून काही जाणवत नाही. त्यात नर्स ने माझ्या अंगावर शाल टाकली. 

              ती स्वेटर घाला म्हणून आग्रह करत होती पण मला नाही आवडत ते. मी नको बोललो. मग तिने माझ्या अंगावर शाल ओढली. आज तर ती औषधांसाठी पण काही बोलली नाही पण मी स्वतःहून मागितली तिला औषध. खुश झाली ती. अशीच रोज आठवणीने गोळ्या घेत जावा म्हणाली. मी वयाने खूप लहान आहे तिच्यापेक्षा तरी पण ती मला मोठ्या माणसांसारखं बोलावते. माझी खूप काळजी घेते ती.