Monday, April 13, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-१०



उपसंहार

                  


              संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी,फोटो,पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू  बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.
      
   
                    पेटी उघडून त्याने पवनचा फोटो बाहेर काढला. एक नजर त्यावर पडताच त्याचे अश्रू अनावर झाले. त्याने तो फोटो बाजूला ठेवला. आपली डायरी उघडली आणि एक पत्र काढलं त्यातून. ते त्याच पत्र नव्हतं, ना त्याला कोणी ते लिहलं होत. पुढे वाकून त्याने ते पत्र शेकोटीच्या अर्धवट जळलेल्या लाकडावर टाकलं. त्या लाकडाच्या न जळलेल्या भागावर ते पत्र पडलं आणि तो ते पत्र वाचू लागला.

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-९





         घाईगडबडीत पवन घरी आला. दरवाजा उघडताच त्याची बुबळ विस्फारली.  दिवाणखान्यात चारही बाजूला अंधार आणि फक्त अंधारच होता त्याच्यामुळे विस्फारून अंधारात काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता त्याने समोर पाहिलं तर सुबोध खोलीबाहेर बसलेला. काहीही हालचाल न करता एका बाजूला मान टाकून तो व्हीलचेअर बसल्याचं त्याला जाणवले. दबक्या पावलांनी पवन हळूहळू अंधाराचा अंधारात तोल सावरत पुढे गेला. पण त्याला अचानक त्याच्या पाठी एक खुसपट आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी आपल्या पाठी असल्याची जाणीव त्याच्या शरीराने त्याला दिली. त्याच्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले.


Tuesday, April 7, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-८

   


                    अझलान त्या जंगलात आला होता. तो धूर,ते धुके ते जे काही होत ते त्याला स्पर्श करत होत. तो पहिल्यांदा या जंगलात आला होता. विचित्र प्रकारे वाढलेली झाडे तशीच उभी होती. जाड खोडात घुबडानी तयार केलेल्या डोल्या तशाच पोकळ होत्या. वर आकाशात साचलेले ढग हळू हळू पुढे सरकत होते. मधेच चंद्रकोर येत आणि लगेच ढगाळ वातावरणात गायब होत. हलकाच वारा वाहत होता. मध्येच एक फांदीची हालचाल पानांचा सळसळत आवाज करत.  अझलानचा फोन वाजला. तो तंद्रीतून बाहेर आला. त्याने फोन उचलला.
  
"तुला बोललो ना मी करतो कॉल म्हणून.........मूर्ख आहेस का?"अझलानने पलीकडे असलेल्या माणसाला शिवी घातली.

Friday, April 3, 2020

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन१-भाग-७



                                
    
       दिवसामागून दिवस चालले होते. अशाच एका सकाळी अझलान,पवन आणि सुबोध दिवाणखान्यात बसले होते. पवन दोन दिवसासाठी बाहेर जाणार होता म्हणून आज सगळे एकत्र नाष्टा करायला बसले. पवन ऑफिस साठी तयार होऊन बसला होता. सुबोध आणि अझलान चा चेहरा कसल्यातरी विचारात गढला होता. तेवढ्यात त्याच्या साठी चहा-पोहे घेऊन टिन्या आला. ते खाऊन पवन ऑफिससाठी निघून गेला.

"मला काही तरी विचारायचं आहे तुम्हा दोघांना." अझलान शांतता भंग करत म्हणाला. "तुम्हाला काही भास होतात का तुम्हाला?"

"म्हणजे नक्की कसल?" टिण्याने उत्साहात विचारले.

"पवनला त्रास नको म्हणून मी आता सांगतोय तुम्हाला."

"काल परवा पासुन मला नीट झोप नव्हती लागत. एक प्रकारची गुंगी वाटत होती. तहान लागली म्हणून मी आमच्या खोलीबाहेर पडलो आणि जागेवरच माझे पाय थबकले."