उपसंहार
संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी,फोटो,पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.
पेटी उघडून त्याने पवनचा फोटो बाहेर काढला. एक नजर त्यावर पडताच त्याचे अश्रू अनावर झाले. त्याने तो फोटो बाजूला ठेवला. आपली डायरी उघडली आणि एक पत्र काढलं त्यातून. ते त्याच पत्र नव्हतं, ना त्याला कोणी ते लिहलं होत. पुढे वाकून त्याने ते पत्र शेकोटीच्या अर्धवट जळलेल्या लाकडावर टाकलं. त्या लाकडाच्या न जळलेल्या भागावर ते पत्र पडलं आणि तो ते पत्र वाचू लागला.
टिण्या,
मी घरी आलेलं पवनला आवडणार नाही. म्हणून हे पत्र लिहून पाठवतोय. तुझ्या पर्यंत ते बरोबररित्या पोहचेल. तू मला पवनने दरवाजा उघडल्याचं सांगितलं आणि त्याच बरोबर सुबोध ची पण तब्येत खालीवर झाल्याचं बोलास. म्हणून मी त्याच्या घरला गेलो. माझी काही पवनशी दुश्मनी नाही. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पर स्वतःच्या अहंकारात बुडालेला तो मला खूप वाईट साईट बोलला. मी ही नकळत त्याला काहीबाही बोललो. पण नंतर मला त्या बेचाऱ्या पोराचा चेहरा राहून राहून समोर येऊ लागला. सुबोध. ऐन जवानीत असा खुर्चीवर बसून राहिलेल्या त्या निष्पाप पोराचं काही वाईट होऊ नये म्हणून मी मागच सगळं विसरलो.
दूर एका गावात गेलो. एक ओळखीचा मांत्रिक होता. त्याच्याकडून एका विधीच समान घेतलं. त्याचे मंत्र आणि तो विधी कसा करायचा हे सगळं दुसऱ्या पत्रात आहे बघ.
पण हा विधी फक्त आणि फक्त रात्री करायचा आहे. कोणाच्याही नजरेत न पडता. जमल्यास तोंड झाकून घे. त्यासाठी तुला पूर्ण दिवसरात्र त्या घरात थांबव लागेल. काही विधी घरात झाल्या नंतर शेवटचा विधी हा जंगलात करायचा आहे. मला खात्री आहे पवन आणि सुबोधचा शत्रू तिथेच असेल. त्यांच्याच ओळखीतला, त्यांच्याच जवळचा कोणी तरी त्याच्या विरोधात कट कारस्थान रचतोय अस मला माझं मन संकेत देतंय.
पवन कितीही उलट बोलला,वाईट म्हणला तरी ही तू माझ्यासाठी हे कर. काहीही झालं तरी तो मालक आहे. त्याच्यामुळे आपल्या घरची चूल पेटती आहे हे लक्षात ठेव. मी बरोबर एक फोन पण पाठवत आहे काही लागलं तर फोन कर.
सुबोध दुसऱ्या पत्रावरून नजर फिरवु लागला. त्याला ते वाचण्यात काही रस नव्हता. कारण त्यावर फक्त काही मंत्र लिहलं होते. काही लिंबू धागे........ ज्यासाठी विधी करायचा आहे त्या व्यक्तीच सामान.......घर भर रात्रीच्या वेळी फिरून भुकटी पसरवणे....... असे काही शब्द होते ते. सुबोध ने चोळामोळा करत ते पत्र शेकोटी मध्ये फेकून दिलं.
लाकडाची आग खाली सरकली. पत्र जळून गेलं. टिन्या निर्दोष असल्याचा पुरावा जाळून गेला.
आता सुबोधने पेटी तुन एक वस्तू बाहेर काढली. तिच्या कडे बघून तो हसत हसत उभा राहिला. चालत शेकोटीच्या जवळ जाऊन वाकून बसला. ती वस्तू त्याने डोळ्या समोर धरली आणि म्हणाला,
"सॉरी पवन,सॉरी अझलान आणि रिअली सॉरी टिन्या."
एवढं बोलून त्याने तीक्ष्ण,लांब,टोकदार, अणकुचीदार आणि रक्ताने माखलेल ते लाकूड पेटत्या शेकोटी मध्ये फेकून दिलं. शेकोटी मध्ये धूर झाला. घरभर विचित्र वास आणि धूर पसरला.
सिजन एक समाप्त.
माझे दोन शब्द
नमस्कार मित्रांनो मी यादव अभिषेक तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि माफी पण मागतो.
माफी या साठी की मी खूप उशिराने भाग टाकत गेलो आणि आभार या साठी की तरीही तुम्ही ते वाचत होता, त्यावर प्रतिक्रिया देत होता.
माफी या साठी की मी खूप उशिराने भाग टाकत गेलो आणि आभार या साठी की तरीही तुम्ही ते वाचत होता, त्यावर प्रतिक्रिया देत होता.
खरं तर सगळे भाग लिहून झाले होते पण अचानक एक किडा डोक्यात वळवळाला आणि मी शेवट वेगळ्या प्रकारे करायच ठरवलं. एक वेब सिरीज सारखा. कोणी तरी पहिल्या भागावर कॉमेंट देखील केली होती की एखादी वेब सिरीज कथा वाटत आहे म्हणून. म्हणून पोस्ट टाकायला उशिर होत गेला. तरीही तुम्ही आवडीने माझी कथा वाचत गेला. त्यासाठी परत एकदा धन्यवाद.
मला माहित आहे कथेचा नववा भाग वाचून तुम्ही निराश झाला असाल. गुढ कथेचा फुगा फटकन फुटला असेल. त्यासाठीच हा उपसंहार.
मी वचन देतो की या कथेचा पुढचा सिजन म्हणजे सिजन दोन चे भाग हे या सिजन एक प्रमाणे उशिराने पोस्ट होणार नाही आणि त्यात सिजन एक मध्ये असलेल्या बऱ्याच घटना, अनुत्तरित प्रश्न त्याचा सविस्तर खुलासा होईल. त्याच बरोबर टिन्याने सांगितलेल्या तीन चित्राच्या मागचं रहस्य देखील पुढे उलघडेल.
या सिजन बरोबर मी देखील तुमचा निरोप घेतोय. भेटू लवकरच!
या आधीचे भाग :-
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-१
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-२
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-३
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-४
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-५
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-६
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-७
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-८
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)-९


kay mitra, kuthe ahes ? navin story kadhi ? I've been waiting :*
ReplyDeleteकुठे असणार मी? घरी लॉकडाऊन मध्ये. नवीन कथा लवकरच यीईल जरा अभ्यासात व्यस्त आहे!
Deleteविचारपूस केलीस धन्यवाद! तू पण काळजी घे.
pareshgcd@gmail.com
ReplyDeleteI am looking for partner at viman Nagar Pune
कसल भारी लिहितोस यार!!! पवनच जान अपेक्षित नव्हतं मला आणि सुबोध... अशी परतफेड करशील स्वप्नात पण वाटले नव्हते. कधी येतोय नवीन season मी वाट बघतोय.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद, तुमच्या कॉमेंट्स मुळे अजून लिहावेसे वाटते.
Delete