Saturday, March 6, 2021

लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२-भाग-५

             


                      पवन आणि मला येऊन बरेच दिवस झाले होते नवीन घरात. पवन घरूनच काम करत होता. त्याचबरोबर तो माझा व्यायाम सुद्धा घेत होता. जेणे करून मी लवकर ठीक व्हाव. टिन्या सकाळी येत घराची सफाई आणि दुपारचं जेवण बनवून जात. परत तो संध्याकाळी येत आणि रात्रीच जेवण बनवून जात असे. सूर्य मावळायच्या आत. अशीच एक शांत शांत दुपार होती. पवन ने आज दुपारी टिण्याला थांबून घेतलं होतं. तो घर साफ करून घेत होता त्याच्या कडून.

जिना उतरत टिन्या खाली आला.


"तुमची आणि वरच्या साऱ्या खोल्या झाडून झाल्या बघा." त्याने सोफ्यावर बसून लॅपटॉप वर बोटे फिरवत असलेल्या पवन कडे बघत सांगितलं.

"नक्की सगळं साफ केलयस ना?" लॅपटॉपवर नजर ठेवत पवन ने विचारलं.

"व्हय जी."

"ते खिडक्या वरचा कागद पण काढलास ना?"

टिन्या गप्प बसला काही बोलला नाही.

मी तिथेच होतो. त्या तीन चित्रांकडे एकटक बघत.
पवन ने त्याच्या कडे पाहिलं.

"बरं मला सांग तुम्ही का लावलेत ते कागद, त्या खिडक्यांवर?" लॅपटॉप बाजूला सारत वैतागलेल्या चेहऱ्याने पवन ने विचारलं.

"घरच्या मागचं दिसू नये म्हणून." टिन्या भीत भीत म्हणाला.

"का? अस काय आहे तिथे?" मी विचारले.

"कायच नाय. तिथं कायच नाय. जंगल हाय. त्यापाठी नदी. जंगल पांढर हाय. हे घर बांधायच्या आदीपासूनच ते जंगल पांढर हाय."

"मग विटा लावून कायमची बंद करायची ना खिडकी."

"कोणत्याबी मालकाला नाय सुचल, तुम्ही अस म्हणार पयलच हाय." टिन्या गांगारून म्हणाला.

"तू पाहिलयस ते जंगल?" पवन ने विचारल.

"नाय बुआ गावची लोक सांगत हुती!"

"हा मग त्यात काय झालं जंगल पांढर हाय तर." पवन टिन्या सारखा टोन काढत म्हणाला. पवन खेचत होता त्याची.

"ही जी भिंतीवर ज्या माणसांची चित्रं लटकवलेली हायती ना ती मेली हुती तिथं. ह्या तिघांची प्रेत सापडली हुती." भीत भीत टिन्या बोलला.

"नक्की काय झालं होतं या घरात." माझी उसुक्ता जागी झाली होती.

"ऐका सांगतो, ही घर हुत या गोऱ्या सायबाचं. इंग्रजांचा अधिकारी हुता त्यो. त्याला ही जागा आवडली आणि त्यानी घर बांधलं हित. त्यो आणि त्याची बायको दोघेच हित राहायची. ही वरची पयली दोन चित्र त्यांची. त्या गोऱ्या सायबान एक रखेल ठेवली हुती. कुणाला बी माहिती नव्हत तिच्या बद्दल. ती कुणाला बी दिसली नाय कधी. दिसली ती तीन मढी."

"पुढे?"

"कोण म्हणतं की गोऱ्या सायबान तिला रखेल म्हणून ठिवली आन त्याच्या बायकुला कळलं. लय भांडण झाली. लोक आस भी बोलत हुती की त्या सायबाची बायको मरायच्या आधी यडयागत वागत हुती, म्हणून त्यान रखेल ठेवली मग लय दिस सायेब हापिसात नव्हतं आलं म्हणून चार दोन मानस हीत, ह्या घरला आली. कोणी बी नव्हतं घरात.  मग पाठी परसात गेली ती माणसं बघायला. तवा ही गोरा सायेब त्याची बायको आणि ती सापडली. मेलेली. तवा आख्या गावाला कळालं त्या रखेली बद्दल. त्या गोऱ्या सायबाच्या मांनसानी तिथंच पुरल त्यांना. तसच. कायबी कार्य नाय केलं त्यांचं. गाववाल्याना बगून भी नाय दिल. ही जी शेवटाच चित्र हाय त्या रखेलीच."

"ते चित्र नीट नाही दिसत. मला तर ती मुलगी वाटत नाही.' मी म्हणालो.

"कुणालाच ते चित्र नाय समजत. काय काय जण म्हणतात की ती पोर नाय पोरग हाय." टिन्या कसनुस म्हणाला.

"तवा पासून ह्या घरात कुणी टिकत नाही. गोरा सायेब आणि त्याची बायको पण चार पाच महिनच हुत."

"म्हणजे भूत त्याला टिकून देत नसतील ना?" पवन हसत म्हणाला.

"न्हाय तसं न्हाय!"

"मग!"

"भूत नाय पण ह्य घर लोकांना फसवत! येग-येगळ सपन दावत. लोकांना कळतं नाय समोरच खरं हाय का खोट, भास हाय की आभास. लोकं यडी हुत्यात. काय बी कळत नाय काय हुत त्यांना. मागच्या मालकाला वाटलं त्यो कपडे धुत हाय पण भानावर आलं तवा कळलं की स्वतःच्या पोरांना पाण्यात बुडवलय. तुमच्या आगुदर राहणारी बाय पण अशीच यडी झाली. कुणास ठाव नाय तिला काय झालं. कधी कधी वाटत की ही घर नाय तर ज्या जागेवर ह्य घर उभं हाय ती जागाच वंगाळ हाय."

"असो ही सगळी अंधश्रद्धा असते." पवन हसत म्हणाला.

"तुमच्या आदीच सायेब बी असच म्हणायचं, पण नंतर त्यांनी बी घाबरून घर सोडलं. म्हणून तर लय कमी किमतीत तुम्हांसनी घर विकल." टिन्या छाती फुगवून सांगत होता. त्याला आपण या सायबला आपलं म्हणणं खरं ते कस पटवून दिलं असे भाव होते.

पवनला आतून त्याच्या भोळेपणाच खूप हसू येत होतं. त्याने टिन्या जवळ बोलवल, "आता मी काय सांगतो ते ऐक, तू ज्या मालकाला बद्दल बोलतोयस तो डोक्यावर परिणाम झालेला माणूस होता. बायकोने घटस्फोट दिला आणि दोन्ही पोरांना घेऊन गेली. त्याच रागात त्याने स्वतःच्या पोरांना पळवल आणि इथं आणलं. बेचारी पोरं आपल्या वडिलांच्या खराब मानसिक स्तिथीला बळी पडली. आणि ती बाई जी वेडी झाली ती ह्या घरात एकटी राहत होती. खूप वर्ष अभ्यास करून पण तिला हवी ती स्कॉलरशिप नाही मिळाली म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला." पवन ने उत्तर दिलं. "हे माहीत होतं का तुला?"

त्याचं उत्तर ऐकून टिन्या गप्प झाला. मी देखील गप्प झालो पण माला पवनच्या बुद्धीचा अभिमान वाटला.

"राहिली गोष्ट त्या जुन्या मालकाची तो अगोदर पासूनच भित्रा होता. मी सगळी माहीती काढुनच हे घर घेतलंय" पवन शांतपणे म्हणाला.

  पवनने टिण्याला दिलेली उत्तर पाहून मी अचंबित झालो. खरच तो खूप हुशार होता.
                 
                   पवन उठला आणि धडधड जिन्यावरून पाय आपटत त्याच्या खोलीत गेला.मी आणि टिन्या पाहत राहिलो.
                    

         
                 एक एक करून सगळ्या खोलीतील खिडक्या ज्यातून घरची मागची बाजू दिसायची म्हणून त्या कागदाने झाकल्या होत्या त्याचे कागद पवन फाडु लागला. माझ्या खोलीतील पण कागद फाडले. पण त्याला दुधी रंगाच्या काच असलेल्या न उघडणाऱ्या खिडकी शिवाय काही मिळालं नाही. तो तावातावाने त्या दरवाजा कडे गेला. धुळीने माखलेला तो दरवाजा त्याच्या कोरलेल्या वर्तुळ नक्षीकामात खूप धुळ-माती घेऊन उभा होता. खूप गोष्टी जश्या मनात साचून राहतात तसा तो दरवाजा ती धूळ सांभाळून उभा होता. तो दरवाजा कोणता टाळा ना तबीज ना कोणत्या कुलपाणे बंद होता. फक्त कडी लावली होती. तीच कडी उघडायला पवन सरसावला.

"आस नका करू सायेब.... त्यो दरवाजा नका उघडू." पवन ला विनंती करत टिन्या म्हणाला.

"तुम्ही तरी बोला" टिन्या मला म्हणाला.

           
                   मी काही तरी बोलणार तेवढ्यात मोठा आवाज करत पवन ने दरवाजा उघडला. हवेचा थंड झोत आत आला. दरवाजा वर असलेले धूळ खाली झडली. मी पवनच्या मागे गेलो. दोन्ही हात पसरून पवन उभा होता. त्याचे डोळे मोठे झाले होते. समोर काय होत त्याला कळत नव्हतं. जंगल तर होत. पण पांढर? पांढर जंगल कसं असेल? सगळ्या काचा दुधी रंगाच्या का होत्या त्याला आत्ता कळाला. खरं तर त्या काचा दुधी नव्हत्या. त्या काचेतून बाहेरच धुकं दिसत होतं.



                     त्या दरवाजाच्या बाहेर खूप झाडी होती. जंगल होत.  त्या जमिनीतून वाफेची वलये वर जात होती. गोल गोल गिरक्या घेत झाडाच्या फांद्या पानात अडकत ती वर जात होतं. सगळी कडे सफेद धूर पसरला होता. ते नक्की काय होत धूर, धूप, धुकं, वाफ काही कळत नव्हतं. बर ती झाड नक्की कोणत्या जातीची ते पण कळात नव्हतं.
 
                  त्या धुरात हरवलेली झाड नीट दिसत नव्हती. दिसत होत्या त्या फक्त अक्राळविक्राळ पसरलेल्या फांद्या. जणू त्या आभाळात जायला निघाल्या होत्या. त्या झाडांचे जाड बुंधे पण त्या धुरात अस्पष्ट दिसत होते. त्या धुराच्या वलयांनी त्या काळ्या बुध्यांना घेरलं होत. एक गोष्ट होती ती म्हणजे ते जे काही होत धूर-धुकं घरात नव्हतं येत. कुंपणाच्या बाहेर होत.
               


                हे बाहेरील दृश्य मी पण पाहत होतो. आपण हे कुठे तरी या आधी ही पाहिलंय मी मनात विचार करत होता. मी दरवाजा बाहेरील दृश्य निहाळू लागलो. धुकं धुकं धुकं आणि फक्त धुकं. मी ते धुकं या आधी पण पहिलं होत माझ्या स्वप्नात जेव्हा मी हॉस्पिटलला होतो आणि पवन माला घ्यायला येणार होता त्या दिवशी मला हे स्वप्ना पडल होत. मला अचानक एक प्रकारची गुंगी आली आणि मी माझ्या नकळत व्हीलचेयर वरुण उभा राहिलो आणि दुसर्‍या क्षणाला मी बेशुद्ध होऊन खाली कोसळलो. 

                 पवन अजून तसाच उभा होता जणू त्या सफेद धुराने  संमोहित केलं होतं.


"सायेब....... सायेब" टिन्या ने पवनला आवाज दिला. आवाज कसला तो भीतीने दिलेली आरोळी होती ती. मी बेशुद्ध व्हायच्या आत माला ती ऐकू आली होती.

                 

मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत होतो. मी उठण्यचा प्रयत्न केला अचानक माझ्या हाताला काहीतरी लागलं ती एक पत्र्याची पेटी होती आणि ती पेटी माझ्या ओळखीची होती ती पेटी डॉक्टर नेगिची होती. माझा हात लागल्यामुळे ती उगडली गेली होती आणि त्यातून काही औषध बाहेर पडली. मी त्यातून काही गोळ्या माझ्या जवळ ठेवल्या. त्या गोळ्या खाल्याने माणूस गुंगीत जातो पण बेशुद्ध नाही होत. 



 औषधांची पेटी घेऊन मी त्यांना दिली.

"तुम्ही हे विसरलात." त्याना मी पेटी वर करत सांगितलं.

"ओह! थँक्स! काळजी घे मी निघतो आता." एवढं बोलून डॉक्टर निघाले.

     
                  टेबलावर जेवण होत. पण पवनच लक्ष नव्हतं जेवणाकडे. सुबोध पण जेवत होता. ताट भरलं असून पण पवन मात्र एकटक शून्यात नजर लावून बसला होता. मी ने आग्रह केला तेव्हा त्याने नकार दिला.



            तो काहीच जेवला नाही हे बघून माला वाईट वाटलं. मी त्याच्या साठी दूध आणलं होतं. खर तर त्या दूधमद्धे मी त्या गोळ्या मिसळल्या होत्या. कारण माला आता अजून वाट बघायची नव्हती एकव्ह एकदा त्याला माझ्या बाहुपाशात घेतो अस झालं होत. पवन माझ्या जवळ होता पण मी त्याला स्पर्श करू शकत नव्हतो.तो माझ्या समोर होता तरीही मी त्याला कीस करू शकत नव्हतो. मी पवन वर प्रेम केले की नक्की मी त्याच्या शरीरावर मला हा प्रश्न सतावत होता. खरंतर उघडणे पवनने स्वतःच्या शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी माझा उपयोग केला होता. कधी माझ्या नकळतपणे तर कधी माझ्या परवानगीने, पण त्याने मला स्वतःच्या शरीराची चटक लावली होती. 


                                            जेव्हा जेव्हा तो समोर येत माझी नजर त्याच्या शरीरावर फिरत. आता तो माझ्यासमोर असून मी त्याला भेटीते घेऊ शकत नव्हतो म्हणुन माझ्या मनाची तडफड होत होती आत्ताच उठून जावं आणि त्याला कवेत घ्यावं असं वाटत होतं. पण मला अगोदर त्याचा विश्वास संपादन करायचा होता. जेव्हा त्याने मला व्यायाम करायला मदत केली तेव्हा त्याच्या नजदीक जाण्याचा मी प्रयत्न केला पण तो त्या प्रयत्नांना काहीही दाद देत नव्हता. तो पूर्वीचा पवन नव्हता. जो माझ्याकडे बघून नजरेत एक वेगळीच धुंदी मध्ये हरवत.


                                             त्याच्या डोळ्यात सतत एक अपराधी पणाची भावना होती. माझं मन आणि माझं शरीर दोघांनाही पवन हवा होता. त्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या नात्याची कदर नाही ठेवली तर मी तरी का ती ठेवावी? याच विचाराने माझ्यातील त्याच्या नकळत त्याच्या शरीराचा उपभोग घ्यायचं ठरवलं मी माझ्या मनावर ताबा ठेऊ शकत होतो पण शरीरावर नाही. म्हणून त्याला बेशुद्ध असताना उपभोगयच मी ठरवलं.


                         मध्यरात्र झाल्यानंतर मी त्याच्या खोलीत गेलो. पण माझ नशिबच खराब तो गाढ झोपी गेला होता माझ्या कडून गोळ्यांची मात्र जास्त झाली होती. पण मी त्याच शरीर खूप वेळ बघत बसलो होतो. शेवटी कंटाळून मी माझ्या खोलीत आलो. मला आमची ती दुपार आठवली जेव्हा घरातले सगळे बाहेर गेले होतो आणि आम्ही एकटेच घरी होतो. मी काही कारणास्तव आमच्या वरच्या माळ्यावर गेलो होतो आणि पवन देखील माझ्या मागेमागे आला होता. त्यावेळी तो एवढा लाजरा बुजरा नव्हता जेवढा आता आहे कारण त्याला त्या वेळी त्याच्या शरीरची आग विझवयची होती ना!  


                                             गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मी माझ्या खोलीत त्याच्या आठवणीत हरवून बसलू होतो. मी माझी डायरी जवळ घेतली त्यात आमचा फोटो होता. मला पवनबद्दल जे काही वाटत ते मी त्यात उतरवत गेलो. मला ती माळ्यावरची दुपार आठवली आणि माझा हात नकळत खाली सरकला.



( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )









2 comments:

  1. किती जळायलाय जिव सुबोधचा पवन बरोबर खेळयला.पवनला कस कळन हे सगळ. उद्या तरी होउ दे रे त्याच्या मनासारख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा कॉमेंट्साठी. हो नक्कीच होईल त्याच्या मनासारखे.

      Delete

जसे लेखकाच्या कथांचे शॉट्स तुम्हाला आवडतात तसे तुमच्या कमेंट्सचे शॉट्स देखील लेखकाला हवेसे असतात. तर हे मराठी शॉट्स कसे वाटले ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा! आणि हो तुमच्या मित्रांना देखील मराठी शॉट्स नक्की द्या! म्हणजे शेअर करा हो!