दुसऱ्या दिवशी वातावरण जरा खराब वाटत होतं. माझी झोपमोड झाली. वीजांच्याच्या जोरदार कडकडा मुळे झोमोड झाली होती. ढगातून जोरदार वीज कडकली त्यामुळे संपूर्ण घर प्रकाशात उजळून निघाला. डोळे उघडतो ना उघडतो तोच पवन धावत माझ्या बेड जवळ आला मी घट्ट डोळे मिटू न घेतले खरतर त्याला असं धावत येताना बघून मी तर थबकलो आणि डोळे बंद करून घेतले. खरतर त्याची नजर माझ्या डायरीवर पडली काल रात्री मी ती तशीच ठेवली होती. त्यात आमचा एक जुना फोटो होता ज्यात पवने मला खांद्यावर उचलून घेतलं होतं पवन की डायरी वाचण्यात गुंग झाला. एवढा गुंग की मी त्याला चोर नजरेने बघतोय हे देखील लक्षात आले नाही.
मी त्याच्याबद्दल काल रात्री जे काही लिहिलं कदाचित ते तो वाचत असावा कारण तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू त्याच्या गालावरून खाली ओघळत आला. मी तसाच निपचित पडून होतो तो स्वतः काहीतरी बडबडत होता त्याचे शब्द माझ्या कानावर पडत होते त्याच्या बोलण्यातून त्याच्या एवढे लक्षात आलं की त्याने नक्कीच काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं आहे आणि त्याने माझ्यावर केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चाताप होत आहे. तो असाच बडबडत होता पण त्याची एक ओळ मला मात्र चांगलीच हादरवून सोडणारी होती. ती म्हणजे तो मला आता दत्तक घेणार होता मगाशी एवढा जोरात वीज कोसळली नसेल तेवढा जोरात आघात माझा काळजावर झाला. मला असं वाटलं हे झोपेचं नाटक करता करता मी कायमच झोपून जावं. मला दरदरून घाम फुटला.
मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी जरासा हललो. पवन निघून गेला तू माझ्या खोलीतून बाहेर जातोच ना जातो रघुचा आवाज माझ्या कानावर पडला मी त्याचा आवाज माझ्या खोलीतून देखील ओळखू तु माझ्या शकतो कारण त्याचा आवाज असा मोठा आणि खणखणीत होता शब्द रघु आणि पवन दरवाजातील संभाषण माझ्या कानावर पडत होतं बिचारा आमच्या काळजीपोटी इथे आला होता विचारलं त्याला नक्कीच टिनाने काल झालेला प्रकार सांगितला असावा. त्याने आम्हाला मदत करण्याचा हात पुढे केला पण पवन सध्या खूप विचित्र मनस्थितीत होता. वाटेल ते रघूला बडबडला आणि त्याचा अपमान करून त्याला दरवाजातून हाकलून दिलं पण जाताजाता रघु जे काही बोलला ते मात्र स्पष्ट माझा माझ्या कानावर पडले. "या घरात मृत्यू तांडव करेल" हे त्याचे शब्द होते. आणि हेच तिचे शब्द खरे झाले. मी अजूनही तसाच पडून होतो.
मी जेव्हा त्याला पहिल्यांदा तेव्हा बघतच बसलो तो काही भारतीय नव्हता एकंदरीत त्याला बघून माझ्या मनात चुळबूळ निर्माण झाली त्या क्षणासाठी मी पवनला देखील विसरून गेलो होतो. उंच आणि धिप्पाड शरीर माझ्या मनात भरलं होतं उन्हातून चालून आल्यामुळे त्याचा चेहरा लाल तांबूस वर्णी झाला होता. आझलान होताच असा कोणी ही त्याच्याकडे पाहत बसेल. पहिलवानाला पण लाजवेल अशी भरगच्च शरीरयष्टी. त्याला शोभेल असा आवाज. नजर पडताच डोळ्यात भरते ती त्याची गोल पसरट छाती. एखाद्या गोल खांबा सारखे पाय. इथल्या वातावरणा मुळे त्याचे लाल झालेले गाल, लाल ओठ, जाड भुवया त्याखाली सुरमा घातलेले डोळे.
मी जरा कचरत होतो त्याच्याशी बोलायला.

सुबोधला एकट नका सोडत जाउ ना. भिती वाटते मग
ReplyDeleteधन्यवाद मित्रा कॉमेंट्साठी. मला तर सुबोधची भीती वाटते!
Delete